सावधान !!! कोरोना दुपटीने वाढले
मुंबई, दि. ४ (पीसीबी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यामध्ये १,३५७ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी ७०० रुग्ण आणि मुंबईत एकाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या होत्या. आता एकदम दुपटीने यामुळे नागरिकांसाह प्रशासननाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क सक्तीचा निर्णय केला आहे. मास्क वापरण्याबाबात सरकार वारंवार आवाहन करत आहे, पण नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने आता आणखी कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत सरकार आहे.