कोरोनाची चौथी लाट लवकरच…?

0
386

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – कोरोनाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आता एक गंभीर इशारा दिली आहे. अचानक वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं गंभीर इशारा दिला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून सावध राहण्याची गरजही WHO कडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकार सतर्क झाले आहे.

WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की लसीकरण झालं असलं तरीही ओमिक्रॉनच्या सगळ्या व्हेरिएंटची लागण होत आहे. आपल्याला कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी तयार राहण्याची गरज आहे. व्हायरसचा प्रत्येक व्हेरिएंट हा लसीमुळे प्रतिकारक्षमता भेदणारा आहे. संक्रमित लोकांची संख्या वाढण्यासोबतच रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणातही मोठी वाढ होईल. सर्वच देशांनी या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात.

वर्ल्ड बँकेचे वरिष्ठ सल्लागार फिलीप शेलेकंस यांनीही कोरोना परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीमंत देशांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाले असतानाच अचानक आथा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपानमध्ये महामारी वाढीस लागली आहे. ब्राझीलही आघाडीवर आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, चार जुलै ते १० जुलै या एका आठवज्यात कोरोनाचे ५७ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या ६ टक्क्यांनी वाढली आहे.