कोयाळी येथे पोल्ट्री व्यावसायिकाला मारहाण करून लुटले

0
341

पिंपरी दि. ११ (पीसीबी) +
खेड तालुक्यातील कोयाळी येथे एका पोल्ट्री व्यावसायिकाला तिघांनी मारहाण करून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री अकरा वाजता शेलगाव-आळंदी रोडवर घडली.

संग्राम जनार्दन घेनंद (वय 29, रा. वडगाव घेनंद, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम हे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते शेलगाव-आळंदी रोडवर एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये जेवण करून ते घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून एका कारमधून तिघेजण आले. त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संग्राम यांना थांबवले. त्यांना मारहाण करून पॅन्टच्या खिशातून आठ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेली.