कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

0
382

खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एक लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 20) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास करण्यात आली.

संजय लक्ष्मण गुडदावत (रा. भीवरेवाडी, कोयाळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गजानन आढे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी गावातील भीवरेवाडी येथे एकाने बेकायदेशीरपणे दारू भट्टी लावली असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास कारवाई केली. त्यामध्ये एक लाख रुपये किमतीचे हात भट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.