कोयत्याने हॉटेलची व गाड्यांची तोडफोड करत गल्ल्यातील रक्कम चोरली,एकाला अटक

0
351

चाकण, दि. २६ जून (पीसीबी) – तिघांनी कोयत्याने व काठीने हॉटेलची तोडफोड करत गल्ल्यातील 4000 रुपये चोरून नेत.हॉटेल समोरील गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार शनिवारी (दि.24) दुपारी चाकण येथील मेदनकर फाटा येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी किशोर उर्फ साईनाथ नामदेव कुऱ्हाडे (वय 26 राहणार चाकण) याला अटक केली असून ओमकार बीसणारे व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्यात अथर्व गणेश ताले (वय 20 राहणार चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोरया अमृततुल्य हॉटेलवर चहाची विक्री करत होते. यावेळी आरोपी अल्टो कार मधून आले व त्यांनी हातातील कोयता व काठीने आरडाओरडा करत हॉटेलची तोडफोड केली. हॉटेलच्या गल्ल्यातील 4000 रुपये जबरदस्तीने काढून घेत, बाहेरील वाहनांचीही तोडफोड करून आजूबाजूला दहशत निर्माण करून ते पसार झाले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.