कोयत्याने वार करत 28 हजारांची रोकड पळवली

0
344

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीच्या हातावर वार करून 28 हजार 300 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री थायसन ग्रुप कंपनीसमोर पिंपरी येथे घडली.

सेहबुद सैफुद्दीन शेख (वय 30, रा. शास्त्रीनगर, पिंपरी. मूळ रा. झारखंड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे चुलते सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर चौक पिंपरी येथून शास्त्रीनगर येथे पायी चालत जात होते. थायसन ग्रुप कंपनीसमोरून जात असताना अनोळखी दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले आणि खिशातून 28 हजार 300 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.