कोयत्याने वार करत व्यावसायिकास लुटले

0
414

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कोयत्याने वार करत चायनीजच्या गाडी चालकाला लुटले. दरम्यान या आरोपींनी व्यावसायिकाच्या भावाला जीवे मरणार असल्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायसीएम हॉस्पिटल समोर पिंपरी येथे घडली.

राजू चंद्रकांत थापा (वय 34, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिंक्या उर्फ अमरकवलसिंग चौहान (वय 33, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), साहिल सुधीर धनवे (वय 22, रा. महेशनगर, पिंपरी) सोन्या रणदिवे, अक्षय रणदिवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या चायनीजच्या दुकानात काम करत असताना आरोपी कारमधून तिथे आले. ‘तुझा मोठा भाऊ कुठे आहे. त्याची विकेट टाकायची आहे’ अशी धमकी देत फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने साडेतीन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या हातावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीस खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परिसरात दहशत माजवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.