पिंपरी, दि. २० (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. तरुणाला गंभीर जखमी करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. १८) रात्री साडे अकरा वाजता पिंपरी भाजी मार्केट येथे घडली.
विशाल मनोज लोट (वय २६, रा. पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलमान शेख (वय ३०, रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी घराजवळ शतपावली करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या सलमान याने फिर्यादीला धमकी दिली. त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी पळून जात असताना त्यांना अडवून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.










































