कोयत्याने मारून महिलेवर बलात्कार करण्याची धमकी; सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाप्रकरणी एकास अटक

0
397

पिंपरी दि. १२(पीसीबी) – महिलेच्या घरात कोयता घेऊन घुसून ‘तुझा नवरा पोलिसांचा खबरी झाला आहे का त्याने माझ्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तुला मारून टाकतो’ असे म्हणत महिलेला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेला बलात्कार करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेअकरा वाजता गांधीनगर देहूरोड येथे घडली.

संदीप दादू खुलसे (वय २२, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप कोयता घेऊन फिर्यादी महिलेच्या दारावर लाथा मारून बळजबरीने घरात घुसला. ‘तुझा नवरा पोलिसांचा खबरी झाला आहे का त्याने माझ्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तुला मारून टाकतो’ असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता मारला. फिर्यादीने कोयता हुकवला. त्यानंतर फिर्यादीला हाताने मारहाण करून जोरात धक्का देऊन भिंतीवर आदळले. त्यानंतर फिर्यादी महिलेला तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.