कोयत्याने केक कापणाऱ्या `भाई`ला पोलिसांचा झटका

0
222

पुणे, दि. १९ (पीसीबी) : खडक पोलीस ठाण्यात हद्दीत कासेवाडी भागात एक टोळकी जन्मदिवस साजरा करत परिसरात जोडरदार राडा घातला आहे. यावेळी भाईने वाढदिवसाच्या वेळी असं काही केलं की आता त्याला ही बाब चांगलीच महागात पडली आहे. ९ एप्रिल रोजी कासेवाडी भागात आतिष लांडगे याने हातात कोयता घेवून वाढदिवसाचा केक कापून आरडा-ओरडा करत राडा केला. याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याची बातमी मिळाल्याने बातमीचा आशय वरिष्ठांना कळविला. दरम्यान, अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस चोख बंदोबस्त करत असल्याने नागरिक खूश आहेत.

या प्रकरणी वरिष्ठांच्या परवानगीने कारवाही करत. सदर इसमास काशिविश्वनाथ महादेव मंदिरासमोर काशेवाडी पुणे इथे ताब्यात घेण्यात आला आहे. आतिष जालिंदर लांडगे (वय २६ वर्षे रा. काशिविश्वनाथ महादेव मंदिरा) कडून एक लोखंडी कोयता ५००/- रू. किंमतीचा माल जप्त करून त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करणात आला आहे.

सध्याच्या काळात गुन्हेगार आणि तरुणांमध्ये रात्रीच्या वेळी चौका-चौकामध्ये गर्दी करून वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार, कोयत्यासारख्या मोठमोठ्या बेकायदेशीर हत्याराने कापले जातात. त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. यावर आळा बसविण्याकरिता सदर प्रकारावर लक्ष ठेवून गुन्हे शाखा युनिट १ कडून कारवाई करण्यात येणार आहे.