कोयत्याच्या धाकाने रिक्षा चालकाला लुटले

0
210

आकुर्डी, दि. १७ (पीसीबी) – रिक्षा चालकाच्या गळ्याला कोयता लावून धमकी देत मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी बस स्टॉप जवळ, विठ्ठलवाडी येथे घडली.

ज्योतीराम बबन सकपाळ (वय 34, रा. चव्हाण नगर, देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते रिक्षा घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. एकाने पट्टा काढून दम दिला. तर दुसऱ्याने कोयत्यासारखे हत्यार फिर्यादी यांच्या गळ्याला लावून त्यांच्या खिशातून सहा हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.