कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साइटवरून साहित्य चोरणारा अटकेत

0
299

तळेगाव, दि. २८ (पीसीबी) : कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साइटवरील लोखंडे सर या चोरणाऱ्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही चोरी तळेगाव स्टेशन परिसरातील सिटी पॅलेजा नावाच्या बिल्डिंग साइटवर रविवारी रात्री घडली.

याप्रकरणी चंद्रबहादूर तिलक दमाई (वय 48 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून संदीप गोविंद राठोड (वय 24) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचे इतर तीन साथीदार मात्र फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन परिसरात सिटी पॅलेजा नावाच्या बिल्डिंग येथे रात्री आरोपी आले यावेळी फिर्यादी तिथे झोपले होते. त्यांना आवाजाने जाग आली असता, आरोपीने त्यांना कोयता दाखवून शांत राहण्यास सांगितले व जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी फिर्यादी च्या डोळ्यासमोर बांधकाम साइटवरून 47 हजार 600 रुपयांच्या लोखंडी सळया टेम्पो मध्ये टाकून चोरून नेल्या. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र त्याचे तीन साथीदार अद्याप फरार असल्याने तळेगाव दाभाडे पोलीस त्यांचा तपास शोध घेत आहेत.