सांगवी, दि. 05 (पीसीबी) : कोयत्याने तरुणावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) जवळकरनगर, पिंपळे गुरव येथे घडली.
तन्मय अविनाश कांबळे (वय 18), तथागत उर्फ आयुष महेंद्र कोले (वय 20, दोघे रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अभी सुरवसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय दत्तू कळसकर (वय 26, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हे त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत घराजवळ थांबले होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. तन्मय आणि तथागत यांनी अक्षय यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. अभी सुरवसे याने कोयत्याने अक्षय यांच्यावर वार केले. यात अक्षय यांचा जीव जाईल याची कल्पना असताना देखील आरोपींनी हा हल्ला केला. त्यानंतर कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.