कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
120

चिखली, दि. 29 (पीसीबी)

कोयता बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 27) रात्री दहा वाजताच्या सुमारास घरकुल चिखली येथे करण्यात आली.

गोपाळ अंकुश हळणवार (वय 21, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष भोर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल परिसरात गस्त घालत असताना गोपाळ याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोनशे रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. गोपाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.