कोयता गँगची माणसे असल्याचे सांगत आळंदीत टोळक्याचा राडा

0
430

आळंदी ,दि.२३ (पीसीबी) – आम्ही कोयता गॅंगची माणसे आहोत, असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने देहूफाटा आळंदी येथे राडा घातला. ही घटना सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

सोहं पद्माकर काळे (वय 23, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शामा विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस (सर्व रा. आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचे आरोपी दुचाकीवरून फिर्यादी यांच्या फळाच्या स्टॉलवर आले. आरोपी कोयता दाखवून म्हणाले की, आम्ही कोयता गॅंगची माणसे आहोत. आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे. तुला येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला दररोज 200 रुपये हप्ता दे. नाहीतर तुझे दुकान तोडून टाकील, अशी धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.