कोयता गँगची दहशत कायम? हॉटेलमध्ये घुसले, पंधरा तोळे सोने लुटले अन्….

0
691

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुण्यात आणि पिंपरी-चिंडवडमध्ये सध्या कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्याच्या चाकणमध्ये अज्ञात तिघांनी हॉटेलमध्ये बसलेल्या पाच ते सहा जणांना लाकडी दांडके आणि पाईपने बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंधरा तोळे सोन्याची चैन हिसकावल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पुण्यात आणि पिंपरी – चिंडवडमध्ये सध्या कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्याच्या चाकणमध्ये अज्ञात तिघांनी हॉटेलमध्ये बसलेल्या पाच ते सहा जणांना लाकडी दांडके आणि पाईपने बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंधरा तोळे सोन्याची चैन हिसकावल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

श्रीराम संतोष होले, प्रतीक उर्फ बंटी दत्तात्रय टाळकर आणि बबलू रमेश टोपे या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी सतीश गव्हाणे हे त्यांच्या काही मित्रांसह हॉटेलच्या समोर बसले होते. अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या मित्रांसह त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून ते फरार झाले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला. चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली असून तीनही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरात म्हाडा वसाहतीत कोयता टोळीचा राडा पाहायला मिळाला. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. हल्ल्यात मिलिंद मधुकर कांबळे (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन टोळके आणि मिलिंद यांच्यात वाद झाला होता.

वादानंतर टोळक्याने हातात कोयते घेत मिलिंद राहात असलेल्या परिसरात येऊन हल्ला केल्याने परिसरात भीतीो वातावरण निर्माण झाले होते.

पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्या विरोधात ॲक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच वरात काढताना दिसत आहेत. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायलादेखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणे सुरू आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.