कोण आहे उषा वेन्स ? US च्या सेकंड लेडीचं भारताशी कनेक्शन काय ?

0
4

दि. 23 (पीसीबी) – डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मात्र त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी दरम्यान गुगल वर एक सर्वाधिक सर्चा होणाऱ्यांमध्ये ट्रम्प यांचं नाव नव्हे तर उपाराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांची पत्नी उषा यांचं नाव होतं. गुगल ट्रेंड्सनुसार, उषा वेन्स धर्म – या सर्चमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. अमेरिका, कॅनडा , दक्षिण आफ्रिका , यूके आणि भारतात हा सर्च सर्वाधिक झाल्याची माहिती समोर आली आहे.
या वेळी हिंदू महिला उषा वन्स यांनी इतिहास रचला आणि पहिली भारतीय-अमेरिकन सेकंड लेडी होण्याचा मान मिळवला. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात हा प्रतिष्ठित क्षण घडला. त्यानंतर जे.डी वेन्स यांनी केवळ उपाध्यक्ष म्हणून नव्हे तर उषा यांनी व्हाईस प्रेसिडेंट यांची पत्नी म्हणून नवी भूमिका सुरू केली. गुगल ट्रेंड्सनुसार, जानेवारी 2025 मध्ये ‘उषा वेन्सचा धर्म’ यासारखे सर्च टर्म वेगाने ट्रेंड होऊ लागले. उपराष्ट्रपती जे. डी. वेन्स हे शपथ घेत असताना त्यांच्याकडे हसतमुखाने पाहणाऱ्या उषा यांचे बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. ते ट्रेंडही होऊ लागले, मात्र तेव्हाच सोशल मीडियावर उषा यांच्या धर्माबद्दलही चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकूरी वेन्स आता उषा वेन्स नावाने प्रसिद्ध आहेत. 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर जे.डी वेन्स हे उपराष्ट्राध्यक्ष बनले. त्यामुळे उषा या पहिल्या भारतीय-अमेरिकन सेकंड लेडी बनल्या. उषा वेन्स यांचा जन्म 6 जानेवारी 1986 रोजी सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे एका उच्च-मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात झाला. लक्ष्मी आणि राधाकृष्ण चिलुकूरी या उच्चशिक्षित दांपत्याच्या पोटी उषा यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माआधीच 1980 च्या सुमारास हे कुटुंब अमेरिकेला गेलं आणि तिथेच स्थायिक झालं होतं. उषा वेन्सचे विशाखापट्टणमशी घट्ट नाते आहे, जिथे त्यांची आजी चिलुकुरी संथम्मा यांचे घर आहे. त्यांची आजी निवृत्त भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि त्यांचे कुटुंब दक्षिण भारतातील आहे.
उषा यांचे वडील आयआयटी मद्रासमधून पास आऊट झाले, मेकॅनिकल इंजिनिअर असलेले तिचे वडील न डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्याते म्हणून कार्यरत होते. त्यांची आई कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो येथे आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि प्रोव्होस्ट म्हणून काम करते. उषाचे यांनी सुरुवातीचे शिक्षण माउंट कार्मेल हायस्कूलमधून घेतले, जिथे त्यांनी मार्चिंग बँडमध्ये हभाग घेतला. एक नेता आणि पुस्तकप्रेमी म्हणून त्यांची ओळख होती. येल युनिव्हर्सिटीमधून इतिहासात त्यांची अंडरग्रेजुएट पदवी प्राप्त केली. त्यानंतर, उषा यांनी येल लॉ स्कूलमधून ज्युरीस डॉक्टर पदवी प्राप्त केली, जिथे त्या येल लॉ जर्नलच्या कार्यकारी विकास संपादक आणि येल जर्नल ऑफ लॉ अँड टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापकीय संपादक होत्या. 2013 मध्ये येल लॉ स्कूलमध्ये शिकत असताना उषा आणि वेन्स या दोघांची भेट झाली. या दाम्पत्याला इव्हान, विवेक आणि मीराबेल अशी तीन अपत्यं आहेत.