कोणाच्याही भरवशावर आपल्याला राहायचं नाही -अजित पवार

0
5

दि.२९(पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तयार रहा, कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका, विनाकरण मुंबईत राहू नका, मतदार संघात पक्षाचे काम करा अशा सूचना अजित पवारांनी पक्षातील आमदारांना दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार पदाधिकारी बैठकीत अजित पवारांनी हे महत्वाचे विधान केले आहे.पक्षाची प्रत्येक मंगळवारी पार पडणारी बैठक रात्री ट्रायडंट हॉटेलला पार पडली यावेळी अजित पवारांनी पक्षातील आमदारांना आपापल्या पक्षात तयारी सुरू करा, काम करा लक्ष द्या असं म्हटलं आहे.

पक्षाची ताकद दाखवा, मुंबईत फिरू नका मतदार संघात फिरा. संपर्कमंत्री नेमले पण दिलेल्या जिल्हात फिरा, पक्षाचे काम करा, ५० टक्के संपर्कमंत्री काम करत नाही असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बैठकीमध्ये अजित पवारांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे विनाकारण मुंबईत राहू नका, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ घालवा. सध्याचे संपर्क मंत्री नेमलेले आहेत. 50 टक्के संपर्क मंत्री असे आहेत जे मतदार संघात जातच नाहीत. त्यामुळे कुठेतरी पक्षाला नुकसान होऊ शकतं. आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्याही भरवशावर आपल्याला राहायचं नाही. त्यामुळे विनाकारण मुंबईत राहू नका मतदारसंघातील काम करा अशा प्रकारच्या सूचना अजित पवारांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवरती परिस्थिती बघून आपला निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. याबाबत अनेक वेळा अजित पवारांकडून संकेत देण्यात आले आहेत. त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे महायुती म्हणून सामोरे जाऊ पण तरी देखील कोणावरती अवलंबून राहू नका अशाही सूचना त्यांनी आमदारांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावेत अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांनी या निमित्ताने दि