पिंपळे गुरव, दि. ७ (पीसीबी) – कोणतीही माहिती शेअर न करता एका व्यक्तीच्या बँक खात्यातून दोन लाख ५९ हजार ८५० रुपये काही बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. याप्रकरणी संबंधित बँक खाते धारक आणि अज्ञाताच्या विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.
शरद भीमराव पवार (वय ४९, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या बँक खात्यातून दोन लाख ५९ हजार ८५० रुपये त्यांना कोणतीही माहिती न देता इतर बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. दरम्यान, पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती कोणाशीही शेअर केली नाही. तसेच त्यांना कुठला ओटीपी, कॉल, मेसेज देखील आला नाही. असे असताना देखील पैसे ट्रान्सफर झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.









































