कैद्यांच्या हातून साकारताहेत ‘बाप्पा’,

0
176

येरवडा कारागृहात होतेय बाप्पाची निर्मिती

येरवडा,दि. १० ऑगस्ट (पीसीबी) – ज्या हातांनी कधी कोणाचा खून झाला असेल… कधी चोरी घडली असेल… कोणावर अत्याचार झाले असतील… कोणाचा विनयभंग घडला असेल… तर, कधी बलात्कारासारखा नृषंस गुन्हा घडला असेल… तेच हात अनेक वर्षांपासून त्यांच्या वाईट कर्मांची फळे कारागृहाच्या गजाआड राहून भोगत आहेत… पश्चात्तापाच्या धगीत होरपळणारे हे हात आता देखण्या कलाकुसरी घडवू लागले आहेत. आगामी गणेशोत्सवासाठी येरवडा कारागृहातील कैदी देखण्या आणि सुबक गणेश मूर्त्यांची निर्मिती करीत आहेत.