केस मागे घे नाहीतर तुला उभी चिरून टाकतो म्हणत बहिणीलाच दिली धमकी

0
288

पुणे : केस मागे घे नाहीतर तुला उभी चिरून टाकतो म्हणत बहिणीलाच दिली धमकी; कुटूंबीयांनाही दिली खल्लास करण्याची धमकी तुम्ही जी पोलीसात केस दाखल केली ती मागे घ्या, तुम्ही केस मागे नाही घेतली तर मी तुमच्या चौघांना खल्लास करतो अशी धमकी पुतण्यानेच काकास व त्यांचा कुटूंबीयास दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

तुम्ही जी पोलीसात केस दाखल केली ती मागे घ्या, तुम्ही केस मागे नाही घेतली तर मी तुमच्या चौघांना खल्लास करतो अशी धमकी पुतण्यानेच काकास व त्यांचा कुटूंबीयास दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. तीन दिवसापुर्वी पोलीसात विनंयभंगाची तक्रार आरोपी विरोधात दाखल करण्यात होती ही तक्रार मागे घेण्यसाठी आरोपीने फिर्यादी यांना धमकी दिली. हा प्रकार फिर्यादी यांच्या राहत्या घरी काल सोमवार दिं. २२ एप्रिल रोजी कर्वेनगर येथे घडला.

याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात विवेक दशरथ मांडेकर (वय ५९, रा, चंद्रभागा निवास, गल्ली क्रं ५, कॅनल रोड,कर्वेनगर,पुणे) यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीसांनी प्रणव मनोज मांडेकर (वय,२२. रा. सदिच्छा इमारत आऊट हाऊस,कर्वेनगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी व फिर्यादी हे काका-पुतणे असून आरोपी पुतण्या प्रणव रिक्षा चालवतो त्याच्या विरोधात याआधी तीन गुन्हे दाखल आहेत. तर फिर्यादी हे शहरात व्यवसाय करतात. दरम्यान तीन दिवसांपुर्वी आरोपी प्रणव याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्या राहत्या घरी जात त्यांच्या घरासमोर तुम्ही जी केस केली ती मागे घ्या, तुम्ही केस मागे नाही घेतली तर मी तुमच्या चौघांना खल्लास करतो अशी धमकी दिली. तसेत फिर्यादी यांच्या मुलीकडे बघत तु केस मागे घे, नाहीतर तुला उभी चिरून टाकतो अशी धमकी देत तुम्ही घराबाहेर कसे पडता,तुमचे रस्तेच जाम करून टाकतो असे म्हणत लोखंडी कोयता काढून दमदाटी केली.

दरम्यान, आरोपीने कोयता हवेत फिरवत तुम्हाला कोणी सोडवायला आले तर त्याला देखील खल्लास करून टाकतो असे जोर-जोरात ओरडला असता फिर्यादी यांच्या शेजाऱ्यांनी त्यांची घरे बंद करून घेतली. त्यावेळी मुलगा ओंकार याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीस घराच्या आतमध्ये ओढून घेत दरवाजा बंद करून घेतला असता आरोपीने कोयत्याने घराच्या खिडकीच्यी काचा फोडून नुकसान केले. पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.