केवायसी व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने तळवडे येथे तरुणाला घातला साडेसात लाखांचा गंडा

0
486

तळवडे, दि. २९ (पीसीबी) – केवायसी व्हेरिफिकेशन करण्यासाठी ट्विटरवर मेसेज करून तरुणाला एनी डेस्क नावाचे एप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे तरुणाच्या नावावर सात लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केली. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी तळवडे येथील स्टार इंजिनिअर कंपनीत घडली.

नीरज नरेंद्र जोगळेकर (वय २६, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी २८ ऑक्टोबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 916290458227 या मोबिल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या ट्विटरवर आरोपीने मेसेज केला. तुमचे एक्सिस बँकेचे केवायसी व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यासाठी मोबाईलवर एनी डेस्क नावाचे एप डाउनलोड करा, असे आरोपीने फिर्यादीस सांगितले. त्यानुसार नीरज यांनी ते एप डाउनलोड केले. त्यावर नीरज यांनी त्यांचे पॅनकार्ड दाखवून प्रोसेस केली केली असता काही वेळाने त्यांच्या बँक खात्यातून सुरुवातीला पाच लाख ५६ हजार ६५० रुपये आणि नंतर एक लाख ९१ हजार ६६० रुपयांचे असे एकूण सात लाख ४८ हजार 3३३ रुपयांचे कर्ज घेत नीरज यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.