दि. २३ जुलै (पीसीबी) बँकेतून बोलत असल्याचे सांगत एका तरुणाची 21 लाख 44 हजार 301 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 ते 10 जुलै 2024 या कालावधीत हिंजवडी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.
हिंजवडी येथे राहणार्या 31 वर्षीय तरुणाने याबाबत सोमवारी (दि. 22) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9154262916 या मोबाइल क्रमांकावरील अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाइलवर आरोपीने कॉल केला. आपण ॲक्सीस बँकेतून बोलत असल्याचे सांगत केवायसी व्हेरीफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी तरुणाकडून नेट बँकिंगची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे 14 लाख 65 हजार 201 रुपयांचे कर्ज काढले. तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्यावर असलेली सहा लाख 79 हजार 100 रुपये ट्रान्सफर करून घेत एकूण 21 लाख 44 हजार 301 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.