केवळ गैरसमजातून तरुणावर कोयत्याने केले जिवघेणा वार

0
448

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – कुत्र्याला शिवीगाळ करत असताना झालेल्या गैरसमजातून एकाने 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने जिवघेणे वार केले आहेत. हि घटना पिंपरी मार्केट येथे बुधवारी (दि.25) घडली.

याप्रकरणी प्रविण राजू शिरठाणे (वय 22 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनासार, फिर्यादी हे हमालीचे काम करतात, ते पायी जात असताना पिंपरी मार्केटमध्ये एक कुत्रा त्यांच्या अंगावर धावून आला, यावेळी फिर्यादीने कुत्रायाला शिवीगाळ केली. हि शिवीगाळ फिर्यादी मला करत आहे समजून आरोपीने दमदाटी करत भांडण्यास सुरुवात केली. भांडण वाढले असता आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वरा करत गंभीर जखमी केले. यावेळी वाचण्यासाठी फिर्यादीने डोक्यावर हात ठेवले असता आरोपीने पुन्हा वार करत फिर्यादीचे बोट तोडले.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीवर जिवघेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचे शोध घेत आहे.