केतकी चितळे पुन्हा ट्रोल

0
315

मुंबई, दि. 28 (पीसीबी) – अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत येत असते. यामुळं तिला जेलची हवाही खावी लागली आहे. परंतु तरीही केतकी आपले मत बिनधास्तपणे मांडत असते. आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे.

केतकीने प्रजासत्ताक दिनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. केतकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत, केतकी जात विचारायला आलेल्या महिलेची चौकशी करताना दिसत आहे. ‘तुम्ही जात विचारायला का आला आहात?’ असं ती विचारते. यावर उत्तर देत ती महिला म्हणते की, ‘मराठा आरक्षणासाठी सर्व्हे सुरु आहे’.

यावेळी ती महिला केतकीला ‘तुम्हीपण मराठा आहात का?’ असा प्रश्न विचारते. तेव्हा केतकी म्हणते, “अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे”. ती महिला गेल्यानंतर केतकी पुढे म्हणते की, “प्रत्येक नागरिकाला समान कायदा नाही आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सर्व्हे सुरु आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” आता या व्हिडीओवरून केतकीला नेटकरी ट्रोल करत आहेत.

केतकीने व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान, असं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत केतकीने स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

यानंतर केतकीला अनेकांनी सुनावलं आहे.एका नेटकऱ्याने कमेंट करत, “तुम्ही पण मराठा आहेत का? असं विचारलं तर जितक्या झटकन ‘अजिबात नाही’ म्हणून ‘ब्राह्मण’ आहे असं सांगितलं.

यावरून कळतं की तुमचा मराठा जातीबद्दल किती द्वेष आहे व स्वतःच्या जातीचा किती अभिमान आहे. तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये?, असं म्हटलं आहे.