केतकी चितळे आता घसरली जरांगे पाटलांवर

0
214

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – केतकीनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत जरांगे पाटलांवर टीका केली आहे. एका रॅलीमध्ये मुस्लिम कार्यकर्ते हिरव्या रंगाचा झेंडा तसंच मनोज जरांगे पाटलांचा फोटो घेऊन एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देताना दिसत आहेत. केतकीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, हातात कोणाच्या कठपुतळीचा फोटो आहे ते बघा. जातपात सोडा. हिंदूंनो, आपण जर एकत्र झालो नाही तर आपल्या घरासमोर हिरवळ दिसायला फार काळ लागणार नाही…

ही पहिलीच वेळ नाहीये की, केतकीनं जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही केतकीनं तिच्या पोस्टमधून त्यांच्यावर टीका केली आहे.
काही महिन्यांपूर्वी जरांगे यांनी ‘धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणाचा लढा मी देईन. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही’, असं म्हटलं होतं. यावर केतकीनं त्यांचं हेच वक्तव्य शेअर टीका केली होती. ‘आता कसं, खरं रुप दिसलं. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा!’, असं तिनं म्हटलं होतं.

‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेतून केतकी चितळे लोकप्रिय झाली होती.त्यानंतर मात्र केतकी फार कुठं दिसली नाही. त्यानंतर एका मालिकेत तिची एन्ट्री झाली होती, पण काही आजारपणामुळं ती मालिकेतून बाहेर पडली. परंतु तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर तिची मते मांडत असते. त्यावरून वादच निर्माण होऊन तिला ट्रोल केलं जाते.