दि. २ ( पीसीबी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे जाहीर अभिनंदन करुन नागरिकांना लाडू भरवून जातिनिहाय जनगणना
या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
आनंदोत्सव साजरा करण्याचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 14 मधील मोहननगर कमानी शेजारील चौकात महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार माननीय अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. यावेळी या निर्णयाचे भविष्यात नागरिकांना होणारे फायदे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले. देशाच्या पंतप्रधानांचा अभिमान वाटत असून असे धाडसी निर्णय केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रात कार्यरत असणारे NDA सरकारच घेऊ शकते असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, भाजप उपाध्यक्ष गणेश लंगोटे, श्री कैलास कुटे, सौ मनिषा शिंदे, चंद्रकांत शिंदे, अविनाश गावडे, जनार्दन तलारे, राकेश ठाकूर, आदी सर्वजण उपस्थित होते.