केंद्र सरकराच्या आदेशा विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक

0
224

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : दिल्ली सरकारला दिलासा देणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं नवा अध्यादेश आणला आहे. यामुळं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले असून त्यांनी थेट विरोधकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

केजरीवाल म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं कट रचला आहे. यासाठी राष्ट्रीय राजधानी सिव्हिल सेवा प्राधिकर तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश आणला आहे. पण याविरोधात मी दिल्लीच्या जनतेमध्ये जाणार आणि दिल्लीत महारॅलीचं आयोजन करणार आहे. ज्याप्रकारे यावर जनतेची प्रतिक्रिया येत आहे, त्यावरुन हे वाटतं की भाजपला लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून एकही जागा मिळणार नाही.

मी विरोधीपक्षांना आवाहन करतो की, राज्यसभेत जेव्हा हे विधेयक येईल तेव्हा ते मंजूर होऊ देऊ नका. यासाठी मी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मागणार आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.