कॅस्ट्रोल कंपनीच्या नावाने बनावट ऑईलची विक्री

0
22

आळंदी, दि. 5 (पीसीबी)
केस्ट्रोल कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री होत असल्याचा प्रकार खेड तालुक्यातील केळगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव श्रीगिरीश श्रीवास्तव (वय ३८, रा. मध्य प्रदेश) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल देवराम म्हस्के (वय ३८, रा. केळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या केस्ट्रोल कंपनीचे लेबल बनावट ऑइलच्या बॅरलला चिकटवून ते ऑइल केस्ट्रोल कंपनीचे आहे, असे भासवून त्याची विक्री होत होती. याबाबत फिर्यादी श्रीवास्तव यांनी खातरजमा करून विक्रीसाठी ठेवलेले एक लाख ८४ हजार ८५० रुपये किमतीचे ऑइल पकडले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.