कॅरम स्पर्धेत ज्ञानेश्वर मोरे यांनी पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

0
280

निगडी प्राधिकरणात ज्येष्ठ नागरिकांसाठी एकेरी कॅरम स्पर्धा

निगडी, दि. १० मे २०२३ (पीसीबी) – निगडी प्राधिकरणातील कँप्टन कदम सभागृह, सावरकर सदन येथे ६, ७ व ८ मे २०२३ रोजी पार पडलेल्या ज्येष्ठ नागरिक एकेरी कॅरम स्पर्धेत ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रथम कमांक पटाकवला. तर, विष्णू भुते यांनी व्दितीय, तर शंकर होनकळस यांना तृतीत क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

माजी नगरसेविका सौ. शर्मिलाताई राजेंद्र बाबर आणि प्राधिकरण निगडी ज्येष्ठ नागरिक क्रिडा संघांच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. शहरातील सर्व भागातून ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धेत बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्ञानेश्वर मोरे प्रथम, पिंपरीतील संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे विष्णू भुते व्दितीय, निगडी ज्येष्ठ नागरिक क्रीडासंघाचे शंकर होनकळस तृतीय, अविनाथ ठीपसे चतृर्थ, संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे रौफ शेख पाचवा, सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे संजय जोशी सहावा, महेश पेंडणेकर सातवा आणि निगडी ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघाचे विवेक देशपांडे यांना आठवा क्रमांक मिळवून विजयी झाले.

स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मा. नगरसेविका शर्मिला बाबर, निगडी पोलीस स्टेशनचे ए पी आय अमोल कोरडे, निगडी ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघाचे अध्यक्ष सुरेश कारंडे, उपाध्यक्ष शंकर होनकळस, सचिव गजानन श्रीखंडे, खजिनदार चंद्रकांत तेली, विलास गायकवाड, ज्ञानेश्वर आढाव, उद्धव पगारे, प्रवीण गाढवे, धोंडिराज ओक, सुहास पाठक आणि जेष्ठ नागरिक क्रीडा संघाचे इतर सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला