कॅब अडवून गाडीची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

0
102

वाकड, दि. ६ –
कॅबला अडवून गाड्यांची तोडफोड करत नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे, ही घटना गुरुवारी (दि.4) वाकड परिसरातील दत्तमंदिर रोडवर घडली.

यश बाळू शिंदे (वय 20 रा.वाकड) व साहिल युनुस शेख (वय 21 रा.वाकड) अशी अटक आरोपींची नावे आहेत, याप्रकरणी मयूर तानाजी चव्हाण (वय 35 रा. वारजे माळवडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या कॅबला अडवून दगडाने गाडीच्या काचा फोडून आतील महिला प्रवाशांना बाहेर ओढून काढले. तसेच फिर्यादी यांनच्या खिशातून 2 हजार रुपये काढून घेतले. आरडाओरड करत त्यांनी इतर तीन रिक्षा व कार यांची तोडफोड करण्यात आली आहे.यावरून वाकड पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.