कॅफेच्या आड अश्लिल चाळ्यांना मुभा देणाऱ्या कॅफेवर पोलिसांची कारवाई

0
124

रावेत, दि. 11 (पीसीबी) – परवानगी नसताना कॅफे चालावून तिथे तरुण-तरुणींना अश्लील चाले करण्यास मुभा देणाऱ्या कॅफेवर रावेत पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) रावेत येथील नॉकनॉक कॅफे येथे करण्यात आली आहे,

याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार पौर्णिमा चव्हाण यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल पांडुरंग राळे (वय 21 रा.भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्याकडे कॅफे चालवण्याचा कोणताही परवाना नसताना तो नॉक-नॉक कॅफे चालवत होता. त्यामध्ये बाहेरच्या बाजूने पडदे लावून तेथे तरुण-तरुणींना अश्लील चाळे सुरु होते. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.