कॅनबे चौकातून दुचाकी चोरीला

0
64

देहूरोड, दि. 30 जुलै (पीसीबी) – तळवडे येथील कॅनबे चौकातून दुचाकी चोरीला गेली. ही घटना 5 जुलै रोजी घडली असून याप्रकरणी 29 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल दिगंबर सातपुते (वय 38, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातपुते यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी कॅनबे चौकातील कलकत्ता स्वीट होम समोर पार्क केली. तिथून अज्ञाताने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.