कॅनडामधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला तोडफोड

0
256

कॅनडा, दि. १४ (पीसीबी) – कॅनडामधील ओंटारियोतील रिचमंड हिल शहरात असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेवर भारताने दुःख व्यक्त केले आहे. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला तोडण्याची घटना घृणास्पद आहे आणि त्याचा तपास सुरु आहे असे कॅनडा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन (सीबीसी) यांनी यॉर्क रीजनल पोलिसांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. योंग स्ट्रीट अँड गार्डन एवेन्यू येथील विष्णु मंदिरातील गांधीजींच्या पुतळ्याचा अनादर करण्यात आला आहे.टोरंटो येथील भारतीय दूतावासाने याबाबतचे ट्विट केले आहे. ‘रिचमंड हिल येथील विष्णु मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अनादर करण्यात आला त्यामुळे आम्ही खूप दुःखी झालो आहोत. यामुळे कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत. या घृणास्पद घटनेची चौकशी व्हावी यासाठी आम्ही कॅनडातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ओटावा येथील हाय कमीशनने सांगितले की, भारतीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या द्वेषपूर्ण गुन्ह्यामुळे भारताला खूप दुःख झाले आहे.आयोगाने असेही म्हटले आहे की, भारताने तपासासाठी कॅनडा सरकारशी संपर्क साधला आहे आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.