कॅनडाच्या व्हिजाच्या बहाण्याने साडे सात लाखांची फसवणूक

0
332

पिंपरी, दि. 09 (पीसीबी) – कॅनडा येथील वर्क व्हिजा मिळवून देतो म्हणून दोघांनी दोघांनी पती-पत्नीची फसणूक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2022 पासून आजपर्यंत देहुरोड व पुणे कॅम्प येथे घडला आहे.

याप्रकऱणी 26 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिला आरोपी व वनराज उर्फ पुष्कराज यश भाटे (रा. कात्रज) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पतीला आरोपींनी आम्ही कॅनडा येथील वर्क व्हिजा मिळवून देऊ असे सांगितले. त्यसाठी वेळोवेळी फिर्यादी व त्यांच्या पतीकडून 7 लाख 58 हजार रुपये घेतले. एकरा महिने उलटून गेले तरी व्हिजा न मिळाल्याने फिर्यादी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस याचा तपास करत आहेत.