कॅनडाची मोठी कारवाई लॉरन्स बिश्नोई गँगला ‘दहशतवादी संघटना’ घोषित

0
6

दि.३०(पीसीबी) – कॅनडाच्या फेडरल सरकारने लॉरन्स बिश्नोई गँग, जी भारतातील गुन्हेगारी संघटना मानली जाते, तिला दहशतवादी घटक म्हणून अधिकृत ओळख दिली आहे.सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी सांगितले की ही घोषणा “भीती व धमकीची हवा निर्माण” करणाऱ्या कृतींना प्रतिबंध करण्याचा भाग आहे.त्या घोषणा करताना म्हटले की, गँगने विशेष समुदायांना निशाना बनवून भिती निर्माण केली आहे आणि त्याचा विस्तार कॅनडात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या नवीन वर्गीकरणामुळे गँगचे कॅनडामधील मालमत्ता जप्त करणे, निधी स्रोत रोखणे आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध दहशतवादी कायद्यानुसार कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे.

लॉरन्स बिश्नोई गँगला दहशतवादी घटक घोषित करण्याचा हा निर्णय, गुन्हेगारी व राजकीय तणावामध्ये कॅनडाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परंतु या निर्णयाचा परिणाम केवळ कायदेशीर कारवाईवरच मर्यादित न राहता, सामाजिक शांतता, समुदायांचे मनोबल आणि भारत-कॅनडा संबंधांवर देखील पडेल.या निर्णयामुळे कॅनडातील परप्रांतीय समुदायात भयाची हवा निर्माण झाली आहे. स्थानिक बिझनेस मालकांना धमक्या व जबरदस्त वसुलीची तक्रार आल्या होत्या.सामाजिक व राजकीय नेत्यांवर दबाव आणण्याचा गँगचा प्रयत्न.ज्या समुदायांवर हल्ले झाले, ते गट भयग्रस्त झाले.


लॉरन्स बिश्नोई गँगवर काय आरोप आहेत?

हत्येचा कट, खंडणी वसुली, शस्त्रास्त्रांची तस्करी, ड्रग्स रॅकेट, आणि बोल्टन, कॅलगरी, वँकुव्हर यांसारख्या शहरांतील स्थानिकांवर दबाव निर्माण करणे हे या टोळीचे प्रमुख आरोप आहेत.गँगचा प्रमुख लॉरन्स बिश्नोई सध्या भारतातील तुरुंगात बंद आहे, मात्र त्याचे नेटवर्क कॅनडासह अनेक देशांमध्ये सक्रिय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.कॅनडाने घेतलेला हा निर्णय गुन्हेगारी आणि दहशतवादविरोधी लढ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला तरी, तो भारत-कॅनडा संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण करतो. एका बाजूला दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेतली जाते आहे, तर दुसरीकडे भारताला काही मुद्द्यांवर गृहीत धरलं जातं, ही भारताची नाराजी स्पष्ट आहे.