कृष्णानगर पोलीस वसाहतीत भर दिवसा घरफोडी

0
220

चिखली, दि. २३ (पीसीबी) -चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृष्णानगर पोलीस वसाहतीत भर दिवसा घरफोडी झाली. दुपारच्या वेळी चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 22) दुपारी बारा ते दोन वाजताच्या कालावधीत घडली.

अभिषेक राजेंद्र ननवरे (वय 25, रा. कृष्णानगर पोलीस वसाहत, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील राजेंद्र ननवरे हे लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत आहेत. राजेंद्र ननवरे शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेले. आई नातेवाईकांच्या घरी संभाजीनगर येथे गेल्या. त्यानंतर फिर्यादी हे दुपारी बारा वाजताच्या सुमारास सोसायटीच्या गणेश मंडळाच्या मंडपात जाऊन बसले. दुपारी दोन वाजता फिर्यादी घरी जेवण करण्यासाठी आले असता त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. लोखंडी कपाटातून चोरट्याने 30 हजार रुपये ओख रक्कम चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.