कृषी विद्यापीठांचे उपयोग काय? नितीन गडकरींनी टोचले कुलगुरुंचे कान..

0
223

नागपूर, दि. १६ (पीसीबी) -भारत कृषीप्रधान देश असताना इतर देशांनी कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त उत्पादने घेतली आहे. मात्र आपल्याकडे आजही उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी ही स्थिती आहे. कृषी विद्यापीठाने उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त यासंदर्भात संशोधन करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिली पाहीजे. नाही तर या कृषी विद्यापीठांचा उपयोग काय आहे. यांच्या वेतनावर सरकारने का खर्च करावा अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावर उपस्थित कुलगुरुंचे कान टोचले तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयोग करण्याचा सल्लाही दिला. नागपूरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित डॉ. सीडी मायी कृषि तज्ञ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

पुढे गडकरी म्हणाले, विविध देशात एकरी सोयाबीनचे उत्पादन भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. अमेरीकेतही एकरी 30 क्विंटल सोयाबीन होते. मात्र भारतात एकरी 4 क्विंटल सोयाबीन होते. कृषी विद्यापीठाचा उपयोग काय आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी व्यासपिठावर उपस्थित कुलगुरुंना केला. मी शेतीमध्ये प्रयोग करतो म्हणून माझ्यावर 1600 कोटींच कर्ज झाला आहे. कारण मीच सर्व प्रयोग करतो. हे कार्य कृषी विद्यापीठ आणि सरकारचं असल्याचेही यावेळी त्यांनी अधोरेखीत केले.विदर्भातील कापसाचा महत्व बांगलादेशमुळे प्राप्त झाला आहे. यंदा वर्धा येथील पोर्टवरुन बांगलादेश कापूस पाठवू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच देशातील पाण्याच्या समस्येवर सुधीर भोंगळे यांनी काम करावं, हवं असलेलं सर्व सहकार्य मी करणार अशी हमीही त्यांनी यावेळी दिली. दर्जेदार पिकांसाठी चांगल्या रोपांची गरज आहे. त्याच्या निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 नर्सरी तयार झाल्या पाहीजे. आम्ही अॅग्रोव्हिजन नावाने प्रदर्शन भरवतो. त्यात 3 लाखाच्यावर शेतकरी भाग घेतात. त्यांना डॉ. मायी यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी इजराईलच्या अत्याधुनिक शेतीवर लिखान केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचविलं. अनेकांनी शिक्षण क्षेत्रावर फोकस केलं पण शेतीवर फोकस करणं सगळेच विसरले आहे.

…तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीपुढे गडकरी म्हणाले, जर कृषीमध्ये 50 टक्क्यांच्यावर सिंचन झालं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. मी सिंचन मंत्री असताना अनेक सिंचन प्रकल्पाचे काम केले. तुम्ही नदी जोड प्रकल्पावर काम करा मी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांवी दिली. देशातील राज्य पाण्यासाठी एकमेकांसोबत भांडत होते. मात्र संवाद वाढवून सर्वांचे भांडण मिटविण्याचा काम मी केला असल्याचे यावेली गडकरींनी सांगितले