राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी आज कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांंच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असे बोललं जात आहे.