कु.मनीषा राठोड व श्रावणी सावंत यांचा कबड्डी दिनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते सत्कार…

0
435

पिंपरी,दि.११(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु. मनीषा राठोड व श्रावणी सावंत यांचा कुमारी व किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते १५/७/२०२३ रोजी कबड्डी महर्षी श्री बुवा साळवी यांच्या जन्मदिनी, (कबड्डी दिनी) ठाणे येथे प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक श्री बाबुराव चांदेरे यांनी त्यांच्या पत्राद्वारे दिली आहे.

मनीषा व श्रावणी यांचे श्री मनोज लोणकर उपायुक्त क्रीडा पिं चिं मनपा, श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री परशुराम वाघमोडे प्रशासनाधिकारी क्रीडा विभाग, श्री दत्तात्रेय झिंजुर्डे सरकार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, श्री दीपक कन्हेरे क्रीडा पर्यवेक्षक, श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव यांसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन केले आहे. मनीषा व श्रावणी यांना श्री आटवे बन्सी प्र. क्रीडा पर्यवेक्षक, श्रीमती सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले आहे.