कुवेत येथे नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

0
298

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – कुवेत येथे नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाने तरुणाची 20 हजारांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सन 2021 ते 31 मे 2022 या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.

राजी जमाल अहमद (वय 28, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरशद खान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरशद खान याने फिर्यादी यांना कुवेत येथे नोकरी लावतो असे आमिष दाखवले. कुवेत येथे व्हिजा मिळविण्यासाठी म्हणून फिर्यादीकडून आरोपीने 20 हजार रुपये घेतले. त्यानंतर व्हिजा मिळवून न देता तसेच नोकरी न लावता आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.