कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी श्री बापूसाहेब जाधव तर उपाध्यक्ष पदी संभाजी चौधरी

0
4

पिंपरी, दि. २१ – कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच हॉटेल माइल स्टोन – मोशी येथे संपन्न झाली. या सभेत पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी श्री बापूसाहेब जाधव तर उपाध्यक्ष पदी श्री संभाजी चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
कुलस्वामिनी प्रतिष्ठान हे गेली सुमारे १2 वर्षे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहे . त्यामध्ये विद्यार्थ्यांकरिता आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण , वारकऱ्यांसाठी आळंदी ते पंढरपूर या वारीच्या रस्त्यावर आरोग्य सेवा, निसर्गनिर्मित आपत्तीच्या वेळी आर्थिक व वस्तुरूपाने सहाय्य, शालेय विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन असे विविध उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी यशस्वी पणे राबविण्यात
येतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यावरण, संस्कार संवर्धना विषयी समाजा मध्ये प्रबोधनाचे कार्य सुरु असते. तसेच प्रतिष्ठनच्या वतीने दरवर्षी ” गोंदण दिवाळी विशेषांक ” प्रकाशित होत असतो .
सन २०२५ ते २०३० साठी नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे निवडण्यात आली
अध्यक्ष – श्री बापूसाहेब बाबुराव जाधव
उपाध्यक्ष – श्री संभाजीराव बाळासाहेब चौधरी
सचिव – डॉ. चांगदेव दशरथ पिंगळे
खजिनदार – श्री विठ्ठलराव बबनराव जाधव

श्री सुखदेव साकोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले .
यावेळी – कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य मा. प्राचार्य श्री. पी. के गाडिलकर सर, मावळते अध्यक्ष डॉ. नंदकुमार माळशिरसकर, श्री. ज्ञानेश्वर खैरे, डॉ. सुभाष पिंगळे , श्री. अरुणराव साकोरे, श्री . प्रशांत एखंडे, मा. प्राचार्या सौ. उज्वला पिंगळे, सौ. शांता साकोरे, श्री. संदिप चौधरी, श्री दिनेश वाडेकर, श्री अर्जुन जाधव श्री मछिंद्र जाधव इ. उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड व पाबळ परिसरातून अनेक जण या नूतन कार्यकारीणी चे अभिनंदन करत आहे.