कुरुळी स्नेह मेळाव्यात शाळेस ध्वनीक्षेपक यंत्रणेसह सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट

0
57

एक लाख रुपये खर्चून मदत ; माजी विद्यार्थ्याचे कौतुकास्पद कार्य

आळंदी, दि.२० जुलै (पिसीबी) : भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे १९९५-९६ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन कुरुळी येथील क्राउन प्लाझात आयोजन करीत पुन्हा सुसंवाद साधला. यावेळी सरस्वती पुजन करुन उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी सर्व उपस्थित शिक्षकांचा सन्मान करण्यात आहे. कुरुळी स्नेह मेळाव्यात शाळेस ध्वनीक्षेपक यंत्रणेसह सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यासाठी एक लाख रुपये खर्चून माजी विद्यार्थ्यानी कौतुकास्पद कार्य करीत मदत प्रदान केली.

यात अंगणवाडी शिक्षिका चंद्रभागा कांबळे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मिरा अभंग / कोल्हे, सुनिता वाव्हळ, भैरवनाथ विद्यालय कुरुळीचे माजी मुख्याध्यापक मधुकर नाईक, राजबा पवार, विद्यमान मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे, माजी सहशिक्षक मनोज नायकवाडी, गंगाधर गिरमकर, भाऊसाहेब थोरात, निवृत्ती भुजाडे, प्रदीप लोखंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अश्विनी काळजे, प्रा.सुनीता बनकर, ज्योती दर्शले, डॉ.उज्वला मिसाळ, शैलेशशेठ कड, मदनशेठ गायकवाड, संपतशेठ बागडे, कुंदन सोनवणे, नितीन सोनवणे, सूर्यकांत बधाले, नरेंद्र बधाले, प्रकाश ढोले यांनी मनोगते व्यक्त केली. अंगणवाडी पासुन ते माध्यमिक विद्यालयीन आठवणींना उजाळा यावेळी मिळाला. जीवन शैलीत जे संस्कार करण्यात आले. त्या संस्कारांचा कसा उपयोग होत आहे हे सांगत असताना विद्यार्थी भाऊक झाले होते. काहीचे डोळे भरुन आले. या सर्व शिक्षकांनी तन मनाने जे शिक्षण दिले खरंच कौतुक करणारे होते. असे सामाजिक कार्यकर्ते शैलेश कड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्राध्यापिका सुनिता बनकर अध्यापन करत असताना विद्यालयात जे मिळाले, त्या शिक्षणाचा खुप सारा उपयोग होत आहे. डॅा. उज्वला कड / मिसाळ यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात या माध्यमिक शिक्षणाचा उपयोग होत आहे. बालपणी जे संस्कार झाले. ते सामाजीक जीवन जगत असताण आम्ही ही संस्काराची शिदोरी पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त करत असताना विद्यालयास सर्व वर्गामध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्र देण्यात आले. जवळपास या यंत्रनेसाठी ८० हजार रुपये खर्च तसेच २० हजार रुपयांची सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट देण्यात आली. कुंदन सोनवणे हे ज्या कंपनीत काम करत आहेत. त्या माध्यमातून कुरुळी येथील आतंरराष्ट्रीय एन.टी. बी सिरॅमीक कंपनीचे सीइओ पी. राजासर यांनी कुदंन सोनवणे यांना शाळेस मदत करायची असून काय मदत करावी असे विचारून विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी पाणी बाटल वाटप करण्यास सांगितले. तात्काळ एक हजार पाणी बॅाटल उपलब्ध करुन देऊन वाटप करण्याचे ठरले.सत्कार समारंभानंतर सुरुची भोजनाचे आयोजन करुन सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर शिक्षकांना निरोप देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टी करत संवाद साधला. भविष्य काळात देखील असे सामाजिक उपक्रम राबवून शाळेस मदत करत राहण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी यावेळी केल्याचे स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष शैलेश कड यांनी सांगितले. भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे यांनी आभार मानले. सांगता चहापानाने झाली.