कुरुळी मधून साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

0
9

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

चाकण, दि. 04 (पीसीबी) : चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुळी येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

प्रवीण कपूरचंद राठोड (वय 19, रा. कुरुळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित तंबाखू आणि पान मसाला आरोपीने विक्रीसाठी बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तीन लाख 41 हजार 919 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.