आळंदी- कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रेची बैलगाडा शर्यतीची मेगाफायनल होऊन कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने पटकावला.
कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रे निमित्त भव्यदिव्य २०-२० कुरुळी केसरी २०२४ बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेमीफायनलसाठी जवळ पास ५८ बैलगाडे सहभागी झाले होते. यापैकी मेगाफायनलसाठी वीस बैलगाडे सहभागी झाले. या शर्यती रात्री उशीरा पर्यंत चालु राहिल्या. यामुळे बक्षीस वितरण देखील उशिरा झाले.
यातील ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने ११.०७ मिली पॅाइट सेकंद यावेळेत पूर्ण केल्याने कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे मानकरी ठरले. तसेच विविध बैलगाड्यांनी बुलेट, हिरो होंडा शाईन, २ स्पेंलेडर व २२ हिरो सीडी डिल्कस या गाड्याचे इनाम पटकावले. या वेळी गाडा मालकाचे व बैलगाडा शौकीनांचे तसेच पहिल्या दिवसीच्या अन्नप्रसाचे वाटप प्रसिध्द उद्योजक भरतशेठ कड, कमलताई भरत कड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका यांचे आभार समस्त ग्रामस्थाच्या व कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने विठ्ठल रुखमिणी सांप्रदाय दिंडीचे अध्यक्ष गुलाबराव विठोबा सोनवणे यांनी मानले.