कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून रोख रकमेसह कुरिअरचे पार्सलही लंपास

0
83

दि ७ जुलै (पीसीबी ) चिखली,
कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून कार्यालयातून एक लाखाची रोकड आणि कुरिअरचे पार्सल देखील चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी सहयोगनगर, तळवडे येथे उघडकीस आली.

सचिन पांडुरंग जढर (वय 25, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहयोगनगर तळवडे येथे डिलेव्हरी कंपनीचे कुरिअर कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा ते शनिवारी सकाळी पावणे सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कार्यालयातून एक लाख तीन हजार 384 रुपये रोख रक्कम आणि कुरिअर पार्सलचे 15 हजार 858 रुपये किमतीचे पार्सल चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.