कुरळी गावातून भर दिवसा दुचाकी चोरीला

0
246

महाळुंगे, दि २६ (पीसीबी) – कुरुळी गावात समर्थ पतसंस्थे समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.

अजिंक्य दत्तात्रय जाधव (वय 22, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी कुरळी गावातील समर्थ पतसंस्थे समोर मोकळ्या जागेत पार्क केली. भर दिवसा तिथून त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.