दि. 29 जुलै (पीसीबी) नवी दिल्ली, : भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली. विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे.
अमझद मिर्झा यांनी काय दावा केला आहे?
अमझद मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे एसएसजी जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अदिल रेहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानी लष्कराच्या संपूर्ण एसएसजी तुकडीने कुपवाडा आणि इतर भागात घुसघोरी केलेली आहे. संपूर्ण तुकडीची घुसघोरी म्हणजेच पाकिस्तानचे साधारण 600 सैनिक कुपवाडा आणि इतर भागात घुसलेले आहेत, असा दावा मिर्झा यांनी केला आहे.