कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

0
945

पुणे, दि. १६ (पीसीबी) : सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक लाजीरवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या पाळीव कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देत एका नराधमाने २८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा घटना समोर आली आहे. संग्राम कोरेकर असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संग्राम कोरेकर याने कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला तिच्या कुत्र्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कुत्र्याला गॅलरीतून फेकून मारून टाकेल अशी धमकी देत महिलेवर बलात्कार केला.

तसेच या २८ वर्षे पीडित महिलेला आरोपीने तिच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. तसेच तिला आरोपीच्या कोंढव्यातील घरात चार ते पाच दिवस जबरदस्तीने बंद करून मारहाण करत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. दरम्यान या प्रकरणी आरोपी विरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.