कुत्रा भुंकतो म्हणून दोघांवर कोयत्याने वार

0
399

देहूरोड, दि. २२ (पीसीबी) – कुत्रा सारखा भुंकतो म्हणून चुलत्याने पुतण्या आणि पुतणीवर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी आझादनगर, मामुर्डी येथे घडली.

शरद माणिक जाधव (वय 21, रा. आझादनगर, मामुर्डी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ धोंडीराम जाधव (वय 35) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कुत्रा आरोपीला सारखा भुंकतो. याचा राग आरोपीच्या मनात होता. आरोपी हा फिर्यादी यांचा चुलता आहे. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या घराच्या छतावर जाऊन शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या परिवाराला खल्लास करण्याची धमकी देत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या बहिणीला देखील कोयत्याने मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.